|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » दूधात भेसळ करणाऱयांना तीन वर्ष शिक्षा

दूधात भेसळ करणाऱयांना तीन वर्ष शिक्षा 

ऑनलाईन टीम / मुंबई

दुधात भेसळ करणाऱयांना तीन वर्षापर्यंतची शिक्षा करणारा कायदा लवकरच राज्यात लागू करण्याबाबत घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली आहे.

विधानसभेत दूध भेसळीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना त्यांनी घोषणा केली. सध्या दुधात भेसळ करणाऱयांना सहा महिण्याची शिक्षा आहे. पण या प्रकरणात त्वरीतच जामीन मिळतो. ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपींना जामीन मिळणार नाही. यामुळे तीन वर्षाची तरतूद असणारा कायदा लवकराच लागू केला जाईल. सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात चार मोबाईल व्हॉन सक्रिय आहेत. ज्या गतीने या व्हॅनद्वारे तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याबद्दल कबुली देतांना संबंधित अधिकाऱयांना त्याबाबत समज देण्यात येईल. अशी ग्वाही बापट यांनी विधानसभेत दिली.

 

Related posts: