|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » विविधा » राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वतःच्या मालकीचे विमान

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वतःच्या मालकीचे विमान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानानंना लवकरच स्वतःच्या मालकीचे विमान मिळणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

केंद्र सरकारने एअर इंडियाकडून बोईंग 777-300 एक्सेंटेड रेंज या प्रकारातील दोन विमाने विकत घेतली आहे.सध्या या विमानांमध् व्हीआयपी कक्ष, पत्रकार परिषदेसाठी खेली आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठीच कक्ष तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या विमानात वायफाय आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणाही असेल,अशी माहिती सरकारी अधिकाऱयांनी दिली आहे.

 

 

 

 

Related posts: