|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » लाच स्वीकारणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक

लाच स्वीकारणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक 

ऑनलाईन टीम / पुणे

पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकास व वैद्यकीय अधिकाऱयास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ अटक पकडले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जयराम धेंडे (वय 40) व आरोग्य निरीक्षक मधुकर निवृत्ती पाटील (53) अशी याप्रकरणी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एसीबीकडे तक्रार दाखल केलेले तक्रारदार हे डॉक्टर असून, त्यांचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचा नोंदणी परवाना नूतनीकरणाकरिता पुणे महानगरपालिकेकडे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हे प्रकरण ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे होते. तेथील आरोग्य निरीक्षक मधुकर पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धेंडे यांनी याकामी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीला तक्रार दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोषी वैद्यकीय अधिकाऱयांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

 

Related posts: