|Monday, December 10, 2018
You are here: Home » Top News » ‘एसबीआय’चा ग्राहकांना मोठा दिलासा

‘एसबीआय’चा ग्राहकांना मोठा दिलासा 

ऑनलाईन टीम / मुंबई

एसबीआयने बचत खात्यामधील मिनिमम मासिक रक्कम न ठेवल्यास लागणाऱया दंडात कपात केली आहे. बँकेने आकारण्यात येणाऱया दंडामध्ये 75 टक्क्मयांपर्यंत कपात केली आहे.

आता कोणत्याही ग्राहकाला 15 रूपये आणि 10 रूपये जीएसटी यापेक्षा जास्त दंड द्यावा लागणार नाही. मेट्रो आणि शहरातील ग्राहकांना बचत खात्यात सरासरी मासिक रक्कम न राखल्यास दर महिन्याला 50 रूपयांचा दंड द्यावा लागत होता. पण आता शहरांमधील एसबीआयच्या ग्राहकांना 15 रूपये दंड द्यावा लागणार आहे. पण, दंडाच्या रकमेसह 10 रूपये जीएसटी द्यावा लागणार आहे. अशा प्रकारे उपनगरातील ग्राहकांसाठी प्रतिमहिना 40 रूपयांचा दंड द्यावा लागत असे. पण आता त्यात कपात होवून रक्कम 12 रूपये इतकी करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रतिमहिना 40 रूपयांचा दंड आकारला जात असे. त्यात कपात होवून रक्कम 10 रूपये झाली आहे. म्हणजेच महानगर आणि शहरी ग्राहकांना एकूण 25 रूपये, उपनगरातील ग्राहकांना एकूण 22 रूपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना 20 रूपयांचा दंड द्यावा लागणार आहे. यामध्ये त्यांना अनुक्रमे 25, 18 आणि 20 रूपयांचा दिलासा मिळणार आहे.

तुमचे बचत खाते महानगरामधील एखाद्या शाखेत असेल, तर तुम्हाला 3,000 रूपयांची सरासरी मासिक रक्कम ठेवावी लागणार आहे. जी सप्टेंबर 2017 पूर्वी 5,000 रूपये होती. आता शहरी भागातील शाखांच्या बचत खात्यांमध्येही 3,000 रूपयांची मिनिमम रक्कम ठेवणे गरजेचे आहे. उपनगर आणि ग्रामीण भागातील खात्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे 2,000 रूपये आणि 1,000 रूपये निश्चित करण्यात आली आहे. एसबीआयने सरासरी मासिक रक्कम न राखलेल्या ग्राहकांकडून केवळ 8 महिन्यांमध्ये 1,771 कोटी रूपयांची रक्कम वसूल केली. दंडामधून वसूल केलेली रक्कम जुलै ते सप्टेंबरमध्ये बँकेला झालेल्या 1,581.55 रूपयांच्या नफ्यापेक्षाही जास्त आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात झालेल्या 3,586 कोटी रूपयांच्या एकूण नफ्याच्या अर्धी आहे.

 

Related posts: