|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुसऱया दिवशी 978 उमेदवार पात्र

दुसऱया दिवशी 978 उमेदवार पात्र 

पोलीस भरती : दुसऱया दिवशी 1500 पैकी 1,020 उमेदवार उपस्थित

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्गनगरी येथे सुरू झालेल्या पोलीस भरतीच्या दुसऱया दिवशी मंगळवारी 1500 उमेदवारांपैकी 1,020 उमेदवारांनी उपस्थिती दर्शवून भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. पहिल्या दिवशीप्रमाणेच दुसऱया दिवशीही 480 उमेदवारांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली. मंगळवारच्या सत्रात 978 उमेदवार प्राथमिक तपासणीत पात्र, तर 42 उमेदवार अपात्र ठरले.

पहिल्या दिवशी 1,216 पैकी 1134 उमेदवार पात्र, तर 85 उमेदवार अपात्र ठरले होते. मंगळवारी दुसऱया दिवशी एकूण 1500 पुरुष उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यापैकी 1,020 उमेदवारच हजर राहिले. हजर राहिलेल्यांपैकी 978 उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र ठरले. सकाळच्या सत्रात या पुरुष उमेदवारांच्या लांब ऊडी, पुलप्स, शंभर मीटर धवणे व गोळा फेक इत्यादीच्या चाचणी घेण्यात आल्या. दुपारनंतरच्या सत्रात 1600 मीटर धावणे व अन्य चाचण्याही पूर्ण करण्यात आल्या. दुपारनंतरच्या सत्रात ज्यांची 1600 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली नाही, त्यांना 14 रोजी ही चाचणी देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 मार्चपर्यंतच्या सर्व उमेदवारांच्या हजेरी पटाची यादी प्राप्त झाली असून ती sindhudurgpolice.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.

Related posts: