|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » उद्योग » सकाळच्या सत्रातील तेजी बाजाराने गमावली

सकाळच्या सत्रातील तेजी बाजाराने गमावली 

बीएसईचा सेन्सेक्स 61 अंशाने घसरला, एनएसईचा निफ्टी वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी बाजारात तेजी आल्यानंतर मंगळवारी चढउतार दिसून आला. सुरुवातीला बाजारात घसरण झाल्यानंतर चांगली तेजी आली होती, मात्र शेवटच्या तासात दबाव आल्याने घसरण झाली. सत्रातील तेजीदरम्यान निफ्टी 10,478 आणि सेन्सेक्स 34,077 पर्यंत वधारला होता.

मिडकॅप व स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्याने वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.8 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.25 टक्क्यांनी मजबूत झाला. बँक ऑफ इंडियाने 7 हजार कोटीच्या अनुत्पादित कर्जाची वसुली केल्याने समभाग 15 टक्क्यांपर्यंत वधारला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 61 अंकाने घसरत 33,857 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 5 अंकाने वधारत 10,426 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी वधारत 24,739 वर बंद झाला.

औषध, धातू, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू समभागात खरेदी दिसून आली. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2.3 टक्क्यांनी वधारला. आयटी, एफएमसीजी, भांडवली वस्तू समभागात दबाव दिसून आला.

दिग्गज समभागांची कामगिरी

बीपीसीएल, एचपीसीएल, भारती इन्फ्राटेल, ऍक्सिस बँक, गेल, सन फार्मा, विप्रो, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज लॅब 4.5-1.6 टक्क्यांनी वधारले. टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी, कोल इंडिया, मारुती सुझुकी 5.4-0.7 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, एनबीसीसी, कॅनरा बँक, मुथ्थुट फायनान्स 7.5-5.2 टक्क्यांनी मजबूत झाले. अपोलो हॉस्पिटल, सीजी कंज्युमर, सेन्ट्रल बँक, अदानी एन्टरप्रायजेस, ग्लॅक्सो कंज्युमर 2.9-1.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅपमध्ये फ्यूचर कंज्युमर, फ्यूचर एन्टरप्रायजेस, फ्यूचर एन्टरप्रायजेस डीव्हीआर, आंध्रा बँक, वॉटरबेस 19.2-10 टक्के वधारले. जेबीएफ इन्डस्ट्रीज, पिनकॉन स्पिरिट, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स, व्हीएसटी 9.7-4.2 टक्के घसरले.

Related posts: