|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शस्त्रास्त्र खरेदीत भारत जगात पहिला

शस्त्रास्त्र खरेदीत भारत जगात पहिला 

इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीटय़ूटचा अहवाल : 12 टक्के हिस्सेदारी

वृत्तसंस्था/ स्टॉकहोम

शस्त्रास्त्रांच्या खरेदीप्रकरणी भारत पहिल्या स्थानावर कायम असल्याचा खुलासा स्टॉकहोमचा थिंकटँक इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीटय़ूटच्या अहवालाद्वारे झाला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार भारताने 2013-17 या कालावधीत जगात सर्वाधिक शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे.

शस्त्रास्त्रांच्या खरेदी प्रकरणी जगात भारताची हिस्सेदारी 12 टक्के आहे. अहवालानुसार 2008-2013 या कालावधीच्या तुलनेत 2013-17 दरम्यान 24 टक्के अधिक शस्त्रास्त्रांची खरेदी झाली आहे. देशात संरक्षण उपकरणांची पुरेशी निर्मिती होत नसल्याने भारतीय संरक्षण दलांना अन्य देशांवर निर्भर रहावे लागत आहे.

सौदी अरेबिया दुसऱया स्थानी

या अहवालात भारतानंतर सर्वाधिक शस्त्रास्त्रs खरेदी करणाऱया देशांमध्ये सौदी अरेबियाचा क्रम लागतो. त्यानंतर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, अल्जीरिया, इराक, पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांना स्थान मिळाले आहे. शस्त्रास्त्रांच्या खरेदीत आशिया खंडाचा वाटा सर्वाधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

अमेरिकेशी चांगले संबंध

आशियात चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी अमेरिका भारताला साथ देत आहे. याचाच परिणाम म्हणून 2008-2012 च्या तुलनेत 2013-17 कालावधीत भारताने अमेरिकेकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली. या कालावधीत अमेरिकेकडून भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीत सुमारे 557 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. मागील एक दशकात भारताने अमेरिकेकडून 15 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रs खरेदी केली आहेत.

अमेरिका आघाडीवर

शस्त्रास्त्रांच्या विक्रीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. अमेरिकेनंतर रशिया, फ्रान्स आणि जर्मनीचा लागतो. तर चीन पाचव्या स्थानावर आहे. चिनी शस्त्रास्त्रांचा पाकिस्तान सर्वात मोठा खरेदीदार आहे. चीनच्या शस्त्रास्त्र निर्यातीत पाकिस्तानची हिस्सेदारी 35 टक्के तर बांगलादेशची 19 टक्के आहे.

Related posts: