|Saturday, June 23, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

नवी दिल्ली

अयोध्येत राम जन्मभूमीबद्दलच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे तयार आहे. सर्व कागदोपत्री प्रक्रिया आणि अनुवादाचे कार्य पूर्ण झाले आहे. 8 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारसमोर झालेल्या बैठकीत सर्व पक्षांनी याची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालय बुधवारी याप्रकरणी सुनावणी करणार आहे. अनुवादाचे काम पूर्ण झाल्याने याप्रकरणाच्या सुनावणीची पुढील रुपरेषा काय असेल याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वात अगोदर सुन्नी वक्फ मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, यामुळे युक्तिवाद मांडण्याची पहिली संधी त्याला मिळू शकते. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कागदोपत्री प्रक्रिया आणि अनुवादाचे कार्य पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणाशी निगडित 9000 पानांचे दस्तऐवज आणि 90,00 पानांमध्ये नोंद साक्षी फाली, फारसी, संस्कृत, अरबी समवेत विविध भाषांमध्ये आहेत. यामुळे सुन्नी वक्फ मंडळाने या दस्तऐवजांचा अनुवाद करविण्याची मागणी केली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणीची दिशा निश्चित करणार आहे. मागील सुनावणीत काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घेण्याची मागणी केल्याने वाद निर्माण झाला होता.

Related posts: