|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महाविद्यालयीन ड्रेसकोड प्रकरणी राजे सरकारचे घूमजाव

महाविद्यालयीन ड्रेसकोड प्रकरणी राजे सरकारचे घूमजाव 

जयपूर

 राजस्थानच्या शासकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणवेशसक्ती करण्याचा दिलेला आदेश शिक्षण संचालनालयाने मंगळवारी मागे घेतला. महाविद्यालय शिक्षण संचालनालयाने शासकीय महाविद्यालयांमध्ये गणवेशसक्तीचा आदेश विद्यार्थी प्रतिनिधींच्या सूचनेनंतर लागू केला होता. परंतु काही विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतल्याने आता गणवेश परिधान करणे ऐच्छिक केले जात असल्याचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करत जाहीर केले. गणवेशाच्या सक्तीमुळे अनेक विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केल्याचे मला सांगण्यात आले. विद्यार्थिनींच्या मागणीनुसार महाविद्यालयात गणवेशाची सक्ती केली जाणार नाही, असे राजे म्हणाल्या. मुलींना शिक्षण प्रदान करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. गणवेशसक्तीला संघाचा अजेंडा ठरवत विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. भाजप महाविद्यालयांमध्ये स्वतःचे धोरण राबविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

Related posts: