|Saturday, March 24, 2018
You are here: Home » Top News » अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर

अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर 

जोधपूर / वृत्तसंस्था

राजस्थानातील या शहरात ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटच्या चित्रिकरणासाठी गेले असताना महानायक अमिताभ बच्चन यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. तथापि, मुंबईहून त्वरित हेलिकॉप्टरने चार डॉक्टरांचे पथक उपचारांसाठी पाठविण्यात आले. त्वरित उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते पुढील उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती रूग्णालयात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. बच्चन यांचे वय सध्या 75 आहे. त्यांना कोलायटिसचा त्रास असल्याचे सांगण्यात येते.

 

Related posts: