|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » क्रिडा » राजस्थानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार

राजस्थानच्या फलंदाज प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार 

वृत्तसंस्था/ जयपूर

आगामी आयपीएलच्या 11 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने मुंबईचा अनुभवी खेळाडू अमोल मुजुमदारकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे. राजस्थान संघ व्यवस्थापनाने याबाबतची माहिती मंगळवारी दिली.

रणजी व प्रथमश्रेणी क्रिकेटचा मोठा अनुभव मुजुमदारकडे आहे. 171 प्रथमश्रेणी सामन्यात 11,167 धावा केल्या आहेत. याशिवाय, रणजीमध्येही त्याने 9202 धावा ठोकल्या आहेत. मुंबईकडून खेळणारे मुजुमदार तंत्रशुध्द फलंदाजीसाठी ओळखले जातात. यामुळे मुजुमदार यांचा संघातील तरुण फलंदाजांना नक्कीच फायदा होईल. या हंगामात नवीन सुरुवात करताना आम्ही अमोलवर मोठी जबाबदारी सोपवल्याचे राजस्थान संघ व्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केले. आजपासून राजस्थान संघाचे सराव शिबिर जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या शिबिरात अमोल युवा फलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे. काळानुरुप क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. सध्याची तरुण पिढी हे नवे बदल वेगाने आत्मसात करत आहे, त्यामुळे त्यांच्या जोडीने काम करताना आपल्यालाही अनेक गोष्टी शिकायला मिळणार असल्याची प्रतिक्रिया अमोलने यावेळी दिली.

Related posts: