|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कचरावेचक मुलांचा बहारदार नृत्याविष्कार

कचरावेचक मुलांचा बहारदार नृत्याविष्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अवनिच्या स्वाभिमानी बाल हक्क अभियान आणि बाल अधिकार मंचतर्फे आयोजित ‘आता आमचेही ऐका’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.  वीटभट्टी, उसतोड, प्लॅस्टिक मुक्त शाळा आणि कचरावेचक कुटूंबातील मुलांनी यावेळी बहारदार नृत्याविष्कार सादर केला. शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार होते.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष मधुकर बाचूळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दररम्यान, कार्यक्रमाच्या सुरूवातीस पर्यवरण रक्षण आणि मानवा कडून होणाऱया प्रदुषणाचे व्हिडीओ यावेळी दाखविण्यात आले. तसेच नाटय़गीतांमधून वृक्ष संवर्धन, शेतीचे महत्व, पाणी हेच जीवन, गड किल्ले संवर्धन आदी विषयांवर मुलांनी प्रकाशझोत टाकला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागातील वीटभट्टीतील मुले,  आनंद शाळा, बाल अधिकार मंच, डे-केअर सेंटर, बालगृह, प्लॅस्टिक मुक्त शाळा आदी ठिकाणांतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा व बालविकास अधिकारी नितीन मस्के, नगररचना शाखेचे सहाय्यक संचालक संजय चव्हाण, करवीरचे कार्यकारी दंडाधिकारी उत्तम दिघे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रिया चोरगे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, नाटय़ दिग्दर्शक सुनिल माने तसेच सुवानीती सहाय्यता मंचचे भूषण कटककर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अरूण चव्हाण उपाध्यक्ष अनुराधा भोसले, सचिव जयसिंग कदम, जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, अमोल कवाळे, अमर कांबळे, विक्रांत जाधव, आदींनी केले.

Related posts: