|Saturday, June 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महालक्ष्मी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट वार्षिक कामकाज व अहवाल पुरस्कार’

महालक्ष्मी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट वार्षिक कामकाज व अहवाल पुरस्कार’ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 सहकार भारती आणि सहकार सुगंध या अखिल भारतीय स्तरावर सहकाराचे प्रतिनिधित्व करणाऱया संस्थांतर्फे आयोजित राज्यव्यापी ‘प्रतिबिंब’ ही वार्षिक अहवाल स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये महालक्ष्मी को. ऑप. बँकेने ‘सर्वोत्कृष्ट वार्षिक कामकाज व अहवाल’ पुरस्कार प्राप्त केला. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   सोलापुर येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महालक्ष्मी को. ऑप. बँकेतर्फे बँकेच्या उपाध्यक्षा मेघा जोशी, सीए केदार हसबनीस, ज्येष्ठ संचालक महेश धर्माधिकारी, ऍड. राजेंद्र किंकर, उदय महेकर, प्रशांत कासार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश देशपांडे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, महाराष्ट अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सहकार भारतीचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

   बँकेचा सी.आर.ए.आर, सी. डी. रेशो, टायर- 1 व टायर कॅपिटल, बँकेचे ग्रास व नेट एन.पी.ए, डिपॉजिट, कासा डिपॉजिट्स, ऍडव्हान्सेस त्यामागील वाढ, निव्वळ नफा त्याची प्रमाणे, नेट बँकिंग, सी.बी.एस. व नवीन टेक्नॉलॉजीची विविध माध्यमे, नेट इंटरेस्ट मार्जिन, प्रती कर्मचारी व्यवसाय, नफा, अहवालाची मांडणी, प्रेझेंटेशन, आदी निकषांची तपासणी करण्यात आली. यानंतर गुणांनुसार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  दरम्यान, बँकेने आपल्या शतक महोत्सवाची वाटचाल दिमाखात चालू ठेवली आहे. यामध्ये गत आर्थिक वर्षात बँकेने सुमारे आठशे कोटींचा व्यवसाय करून 4.53 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. गेली 11 वर्षे बँकेचा नेट एन.पी.ए शून्य आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून कोल्हापूरसह पुणे, सांगली, नवी मुंबई या जिह्यात महालक्ष्मी को. ऑप. बँक कार्यरत आहे.

Related posts: