|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महिलांनो आता रडायचं नाही, लढायचं..: डॉ. तारा भवाळकर

महिलांनो आता रडायचं नाही, लढायचं..: डॉ. तारा भवाळकर 

प्रतिनिधी/ सांगली

महिलांचं जगणं, म्हणजे रोजचच एका लढय़ासारखं आहे. त्यांचं लढणं म्हणजे ‘रात्र न दिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशा तुकारामाच्या अभंगाप्रमाणंच असतं. त्यामुळे कोणताही प्रसंग आला तर, महिलांनी आता रडायचं नाही, तर फक्त लढायचं, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी केले.

   सौ. प्रभाताई सुर्यवंशी श्रमिक प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱया सौ. प्रभाताई सुर्यवंशी पुरस्कार वितरण कार्यक्रमात कामगार भवन येथे त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर होत्या. डॉ. भवाळकर म्हणाल्या, स्वातंत्र्य हवे असेल तर, स्वातंत्र्याचा निर्णय घ्या, पण परिणामांची जबाबदारी स्विकारण्याचीही तयारी महिलांना ठेवता आली पाहिजे. स्वातंत्र्याचे होणारे परिणाम भोगण्याची तयारी म्हणजेच स्वातंत्र्य, असे त्या म्हणाल्या.

   याप्रसंगी दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱया आशादिप स्कूलच्या प्रमुख सतनामकौर चढ्ढा यांना मान्यवरांच्या हस्ते सौ. प्रभाताई सुर्यवंशी पुरस्कार देवून गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानावरुन जिल्हा माहिती अधिकारी बिडकर यांनी राज्यशासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, भाग्यश्री योजना, दुर्धर आजारावरील उपचार योजना, दत्तक योजना, रमाई योजना आदी विविध योजनांविषयी माहिती दिली.

   याप्रसंगी प्रतिष्ठानचे सेपेटरी ऍड. अजित सुर्यवंशी, तेजस्विनी सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा हेमलता देसाई, डॉ. लता देशपांडे, विद्या स्वामी, आदींसह महिला उपस्थित होत्या.

Related posts: