|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पोलिस भरतीत शारिरीक चाचणीत 732 पुरूष पात्र

पोलिस भरतीत शारिरीक चाचणीत 732 पुरूष पात्र 

प्रतिनिधी/ सातारा

पोलिस भरतीसाठी 121 जागांसाठी तब्बल 18 हजार 82 अर्ज करण्यात आले आहेत. पोलीसभरतीला सोमवार पासुन सुरूवात झाली. याची माहिती उमेदवारांना एसएमएसव्दारे कळविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी तीन दिवस मुदत वाढ मिळाल्याने अर्जांच्या संख्येत वाढ झाली होती. सोमवारी झालेल्या शाररीक पोलिस भरतीत 203 तर पुरूष तर 34 महिला पात्र ठरल्या आहेत. तसेच मंगळवारी झालेल्या दुसऱयादिवशी एक हजार पुरूष उमेदवार बोलवण्यात आले होते. यापैकी 732 उमेदवार शाररीक चाचणीमध्ये पात्र ठरले आहेत

सातारा जिल्हयातील पोलिस भरती सोमवार पासुन सुरूवात झाली. जिल्हयात पोलिस भरतीचे प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. सातारा जिल्हा पोलिस दलामध्ये या वर्षी 121 जागांसाठी भरती होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत 28 फेबुवारी होती. तर प्रत्यक्ष मैदानी चाचणीला सात मार्चपासुन सुरूवात होणार होती. पण सरकारने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तीन दिवसांची मुदतवाढ केली. तर शारीरीक चाचणीची तारीख वाढवून ती 12 मार्च करण्यात आली. उमेदवारांना अर्ज करण्यास मुदत वाढ मिळाल्यानंतर जिल्हयातील 121 जागांसाठी 18 हजार 82 अर्ज आले आहेत.

सोमवारी घेण्यात आलेल्या शाररीक मोजमाप चाचणीत 724 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यापैकी हजर असलेले 220 तर गैर हजर 504 उमेदवार होते. यापैकी 203 उमेदवार पात्र ठरले आहेत तर 17 उमेदवार अपात्र ठरले आहेत. तसेच महिला बॅन्डस्मन उमेदवारांमध्ये 83 महिलांना बोलावण्यात आले होते. यापैकी 43  महिला हजर होत्या तर 40 गैर हजर होत्या. शाररीक मोजमाप घेण्यात आलेल्या पात्र महिला 34 तर अपात्र 9 आहेत.

तसेच मंगळवारी झालेल्या शाररीक तसेच मैदानी चाचणी साठी एक हजार पुरूष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यापैकी 769 उमेदवार हजर होते तर 231 उमेदवार गैर हजर होते. हजर असलेल्या उमेदवारांची शारिरीक मोजमाप घेण्यात आले यामध्ये  732 उमेदवार पात्र ठरले आहेत तर 37 उमेदवार अपात्र ठरले आहेत.

12 मार्च पासुन प्रत्यक्ष शारीरीक चाचणीला सुरूवात झाली. या पार्श्वभुमीवर उमेदवारांकडुन मैदानीचाचणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. पोलिस  भरतीसाठी माहिलांचे देखील प्रमाण वाढत आहे. सकाळ संध्याकाळ विविध मैदानावर पोलिस भरतीचा सराव केला जात आहे. तर विविध अपॅडमीमध्ये उमेदवारांची संख्या वाढलेली आहे. सातारा बसस्थानका शेजारील पोलिस परेड मैदान येथे सुरू आहे. या ठिकाणी प्रथम शाररीक तपासणी, छाती, उंची मापन घेण्यात आले. त्यानंतर मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

Related posts: