|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गुरूदेवांच्या स्वागतासाठी शाहूनगरी सज्ज

गुरूदेवांच्या स्वागतासाठी शाहूनगरी सज्ज 

प्रतिनिधी/ सातारा

मानवतावादी नेता, अध्यात्मिक गुरु आणि शांतीदूत म्हणून ख्याती असलेल्या गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग सोहळा बुधवार, दि. 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सैनिक स्कूलच्या मैदानावर होत असून त्यानिमित्ताने शाहूनगरीत पहिल्यांदाच येणाऱया गुरुदेवांच्या स्वागतास शाहूनगरी सज्ज झाली आहे. शहरातील सर्व रस्त्यांवर मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या स्वागत व गुरुदेवांच्या सानिध्यात महासत्संगाचे फलक झळकत असून त्यावरील श्री श्री रविशंकर यांची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  बुधवारी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खास निमंत्रितांसाठी गुरुसानिध्य, दुपारी 2 ते 5 राज्यभरातील ग्रामीण भागातील प्रशिक्षित युवक साधकांचे युवाचार्य संमेलन व सायंकाळी 6 ते 9 सर्वांसाठी खुला असलेला महासत्संग सोहळा होणार आहे. कार्यक्रमाची तयारी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयोजकांनी जय्यत केली असून  शाहूनगरीत विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या स्वागत फलकांनी सर्व वातावरण गुरुमय होवून गेले आहे.

  योग व अध्यात्मातून जगाला शांतीचा संदेश देणाऱया गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे शाहूनगरीत होणाऱया महासत्संगाची सर्वांनाच उत्सुकता आहे. ज्यांना आपण फक्त दूरवाहिन्यावरुन पाहतो त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, अनुभवण्याची, ऐकण्याची संधी मिळाली असल्याने त्यांच्या सानिध्यात होणाऱया महासत्संगाच्या निमित्ताने शाहूनगरी गुरुदेवमय झाल्याचे चित्र अनुभवास येत आहे.

           

 

Related posts: