|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तुयेतील हॉस्पिटल कामाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

तुयेतील हॉस्पिटल कामाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

प्रतिनिधी/ पेडणे

तुये येथे उभारण्यात येणत असलेले हॉस्पिटल हे गोवा राज्यातील सुसज्ज असे हॉस्पिटल असणार आहे. या हॉस्पिटलाच्या कामासाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्च होणार असून वर्षभरात काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. मंगळवारी तुये येथे भेट देऊन राणे यांनी हॉस्पिटलसंबंधी आढावा घेतला.

यावेळी मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, बांधकाम कंपनीचे जनरल मॅनेजर प्रशांत बुले, प्रकल्प अधिकारी संतोष पुजारी, आरोग्य खात्याचे अधिकारी सुरेखा परुळेकर, डॉ. राजनंदा देसाई, डॉ. जुझे डिसा, डॉ. धुमे, तुये आरोग्य निरीक्षक उदय ताम्हणकर आदी उपस्थित होते.

या हॉस्पिटलाचा फायदा पेडणे तालुक्यातील लोकांसाठी होणार असून कामाचा आढावा घेण्यासाठी सदर ठिकाणी भेट देण्याची मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी विनंती केली होती. त्यानुसार हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतल्याचे राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हॉस्पिटलचे बांधकाम मंदगतीने

नव्याने बांधण्यात येत असलेल्या हॉस्पिटलाच्या कामाची मंत्री राणे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या आमदार दयानंद सोपटे व अधिकाऱयांनी पाहणी केली. यावेळी बांधकाम कंपनी व्यवस्थापकला सूचना करण्यात आल्या. गेल्या काही माहिन्यापासून हे बांधकाम मंदगतीने सुरु असल्याचे सोपटे यांनी आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यापुढे तीन महिन्याने बांधकामाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱयांना केल्या.

 मांद्रे मतदारसंघात 11 उपआरोग्य केंद्र व तिथे असलेल्या समस्या आमदार सोपटे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच तुये सामाजिक आरोग्य पेंद्रातील डॉक्टर्सची कमतरता असून रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी सोपटे यांनी केली. मंत्री राणे यांनी याकडे विशेष लक्ष देऊन समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.

नव्याने बांधण्यात येणाऱया हॉस्पिटलासाठी चांगली मशीनरी तसेच विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर्स यांची नेमणूक करावी लागणार आहे. या हॉस्पिटलाचा आवाका मोठा असल्याचेही राणे यांनी सांगून सदर हॉस्पिटल सुसज्ज बनविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: