|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारला एका वर्षात पूर्ण अपयश

सरकारला एका वर्षात पूर्ण अपयश 

प्रतिनिधी/ पणजी

 सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याने सरकारने निवडणूकीत दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण केलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात सरकारने युटर्न घेतला आहे. राज्यातील विरोधी पक्षही बळकट नसल्याने आम आदमी पक्षाने लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. सरकार लोकांचा आवाज दाबत आहे, असे अरोप आम आदमी पक्षाचे नेते ऍल्वीस गोमस् यांनी पत्रकार परिषदेत केला.

 भाजप सरकारने किमान समान कार्यक्रम, खास दर्जा, बेरोजगारी खाण व्यवसाय असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यावेळी लोकांना दिली होते. पण एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. बेरोजगारीही वाढली आहे. महागाई वाढली आहे. टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविलेले नाही. ग्रेटर पीडीएच्या नावाने लुबाडणूक सुरु आहे. सध्या gमख्यमंत्री आजारी असल्याने सरकार धोक्यात आले आहे. तरी केंद्रीय नेत्यांच्या जोरावर हे सरकार चालविले जात आहे. लोकांच्या हिताचे काम या सरकारने काहीच  पेलेले नाही, असे ऍल्वीस गोमस् यांनी सांगितले.

 भाजप सरकारच्या काळात कॅसिनो वाढलेले आहे. महागाई वाढली भ्रष्टाचार वाढला एक वर्ष पूर्ण झाले तरी सरकारने लोकांचे कुठलेच प्रश्न सोडविलेले नाही, गुंतवणूक प्रौत्साहन मंडळ तयार करुन जमिनीची लूट सुरु आहे. नगरपालीका कायदा नाही अनेक प्रश्न या सरकारने अजून सोडविलेले नाही. सरकारला एका वर्षात पूर्णपणे अपयश आले आहे, असे यावेळी प्रदीप पाडगांवकर यांनी सांगितले.

 भाजप सरकारच्या काळात मोठा भष्टाचार झाला अहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याविषयी आम्ही तक्रार दाखल करणार आहे. हा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर आणणार आहे, असे यावेळी प्रदिप घाडी आमोणकर यांनी सांगितले. यावेळी आपचे अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related posts: