|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिव-शाहू मंचच्या चर्चासत्रात महिलांना मार्गदर्शन

शिव-शाहू मंचच्या चर्चासत्रात महिलांना मार्गदर्शन 

कोल्हापूर :

शिव-शाहू युवा मंचाच्या युवकांतर्फे महिला दिनानिमित्त महिलांना रोजगार निर्मिती व घरकुल योजना याबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्र घेण्यात आले.

यावेळी साथ फौंडेशनच्या मंगल नियोगी यांनी, स्त्रियांमध्ये उपजत कला आहे. ती फक्त जागृत करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. गीता हासूरकर यांनी छोटय़ा-छोटय़ा उद्योगातून उंच यशाची भरारी व महिला आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये बहुउद्देशीय संस्था व फौंडेशनतर्फे रोजगाराची उपलब्धता व त्यासाठी विविध बँका व महिला बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ याबाबत हेमाताई लुगारे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. शहानूर देवळे यांनी मंजूर घरकुल योजनेनुसार माता-भगिनींना 605 घरे देण्याची धडपड चर्चासत्रामध्ये मांडली. चर्चासत्राचे आयोजक म्हणून शिव-शाहू युवा मंचतर्फे महेश म्हाळुंगेकर-पाटील, विशाल पाटील, अतिष पाटील, प्रेम सांगावकर, अभिजित सूर्यवंशी तसेच कोल्हापूर कॉलिंगतर्फे पारस ओसवाल हेही उपस्थित होते.

Related posts: