|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » 2011 मध्ये जिओचा उगम

2011 मध्ये जिओचा उगम 

वृत्तसंस्था/ मुंबई

2011 मध्ये दूरसंचार क्षेत्रात उतरत देशातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा देण्याची कल्पना सुचल्याचे रिलायन्स इन्डस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. 2011 मध्ये आपली कन्या ईशा अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मायदेशी परत आल्यानंतर अभ्यास करताना इंटरनेट वेगवान नसल्याची तिने तक्रार केली. त्यावेळी देशातील इंटरनेटचा वेग अत्यंत निराशाजनक होता. अतिवेगवान इंटरनेट घेणे सामान्य व्यक्तीला परवडणारे नव्हते. सप्टेंबर 2016 मध्ये जिओचा देशात प्रवेश होत देशातील अतिवेगवान सेवा देणारी कंपनी ठरली आहे. यामुळे देशातील डिजिटल क्षेत्रात क्रांती होण्यास मदत झाली, असे अंबानी यांनी म्हटले.

अमेरिका 1जीमध्ये अग्रेसर होती, यानंतर 2जीवर युरोपचे वर्चस्व होते, 3जीवर चीनने मालकी गाजविली, मात्र आता 4जीसाठी भारत अव्वल ठरणार आहे. 2019 मध्ये 4जीमध्ये जिओ देशात प्रथम स्थानी पोहोचणार आहे. अमेरिकेच्या तुलनेत जिओच्या इंटरनेटचे दर 10 पटीने कमी आहेत. देशातील 50 कोटी वापरकर्ते अजूनही फिचर फोनचा वापर करत आहेत. जिओने जगातील परवडणारी 4जी एलटीई स्मार्टफोन देण्यास प्रारंभ केला असे त्यांनी म्हटले.