|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर

साताऱयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा बॉक्सिंग ऍकॅडमीचा पहिला खेळाडू यासर मुलाणी याने रोहतक येथे झालेल्या भारतीय खेल प्राधिकरण मार्फत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक (24 ते 36 किलो वजनगट) पटकावले. यासर मुलाणी याने सातारचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले असून त्याचे यश कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जिल्हाक्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी काढले. 

            रोहतक (हरियाणा) येथे भारतीय खेल प्राधिकरणामार्फत नुकत्याच आंतर साई राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यासर मुलाणी याने मुंबई खेल प्राधिकरणाकडूप्रतिनिधी/ सातारा
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई (मिरज) या पेंद्रामार्फत घेण्यात आलेल्या संगीत विशारद परिक्षेमध्ये दौलत विठ्ठल खंडझोडे (कुशी) यांनी प्रथम श्रेणी मिळाली. खंडझोडे यांना गुरुवर्य संगीत विशारद मोहनगिरी गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच प्रकारे वै.ह.भ.प. किर्तन सम्राट अकबर आबा कुशीकर व वै.भजन गायक बबन मारुती बाबर (अंबवडे) आणि भजन सम्राट सुभाष जाधव यांचा सहवास मिळाला. संगीत विशारद या परिक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळाल्याबद्दल मोहनगिरी गोसावी, नंदकुमार माळवदे, तबला विशारद-विक्रम कणसे, सागर कांबळे व रामदास जाधव, नामदेव भिसे, प्रकाश खुडे व यशोदाशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे सर व यशोदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्नेहल निपुंभ व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
न सहभाग घेतला होता. यासर हा सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा पहिला खेळाडू असून त्याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल सातार्याच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, सचिव रविंद्र होले, क्रीडा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास गोसावी, ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष जयदीप पुसे, विजय मोहिते, नगरसेवक मिलींद काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

            यासर मुलाणी याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक विनोद दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल त्याचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, असिस्टंट कमांडंट डॉ. प्रशांत जगताप, सहायक पोलीस निरीक्षक भूषण आडके, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे जगन्नाथ जगताप, दौलत भोसले, अमर मोकाशी, डॉ. राहूल चव्हाण, संजय पवार आणि सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.