|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

आक्रमकपणा कमी करा. आठवडय़ाच्या सुरुवातीला आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावधपणे पावले उचलावी लागणार आहेत. गुप्तहितशत्रू आपणास अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. मंगळवारपासून कामातील अडचणी कमी होतील. चिकाटी ठेवल्यास शेतीच्या  कामात  यंदा जास्त प्रभावी करू शकाल. विद्यार्थीवर्गाला परीक्षेकडे व अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कष्ट घेतल्यास विजयश्री नक्की खेचून आणता येईल. ग्रहांचा पुरेसा पाठिंबा नसल्याने प्रयत्नांवर जास्त जोर द्यावा लागणार आहे.


वृषभ

कला,क्रीडा क्षेत्रात चुकलेली संधी पुन्हा मिळविण्याची  संधी येईल. कार्यक्रमाची रुपरेषा चांगल्या प्रकारे हाताळाल. नोकरीत मंगळवार, बुधवारी कामाचा व्याप वाढेल. मुले आयुष्याचा आनंद उपभोगतील आणि अधिक खोडकर होतील. त्यांच्या एकाग्रतेच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपल्या विचारांना महत्त्व येईल. वरि÷ आपल्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची शक्मयता आहे. शेतकरीवर्गाला काही दिवस सुखाचे जाणार आहेत. तीन वर्षात जास्त प्रगती संभवते.


मिथुन

थोरामोठय़ांच्या भेटीगाठी संभवतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही महत्त्वाचे कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वरि÷ आपल्या कामावर खूष असणार आहेत. नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्मयता आहे. नाटय़, चित्रपट क्षेत्रात मानसन्मान वाढेल. व्यवसायात भागीदारीत न पडता स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा. विद्यार्थीवर्गाला ग्रहांचा चांगला पाठिंबा आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतात.


कर्क

राजकीय सामाजिक क्षेत्रात तुमच्या निर्णयामुळे  विकासाचा पाया रचता येईल. तुमचे कष्ट घेण्याची तयारी बघून वरि÷ खूष होतील. प्रवासाचे बेत आखले जातील. व्यवसायातील झालेले नुकसान भरून काढण्याची संधी मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात विचारवंताचा सल्ला मोलाचा ठरेल. वैवाहिक जीवनात थोडय़ा अडचणी येतील. जीवनसाथीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. वाद गैरसमज  होणार नाही याची काळजी घ्या. शनिवारी वाहन जपून चालवा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. शेतीच्या कामात पैसा जपून खर्च करा.


सिंह

नोकरीतील राजकारणाने मन थोडे अस्थिर राहणार आहे. नोकरी सोडावी का असा प्रश्न पडेल. आता ग्रहांचा पाठिंबा तसा चांगला आहे. नवीन नोकरीच्या  शोधात रहा. व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात येईल. थोरामोठय़ांचा सल्ला घ्या. मगच पुढे पाऊल टाका. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक राहील आणि त्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढेल. ते नव्या गोष्टी शिकतील. आठवडय़ाच्या सुरुवातीला जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात.   शांतपणे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. कला, क्रीडा क्षेत्रात यशस्वी रहाल.


कन्या

नव्या विषयाकडे मन आकर्षित होईल. धंद्यात आशेचा किरण दिसेल. मंगळवार, बुधवार दगदग, धावपळ याचा त्रास होईल. प्रकृती बिघडण्याची शक्मयता आहे. नातलग मंडळींचा सहवास लाभेल. नोकरीत विचारांचा गोंधळ होईल. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्तहितशत्रू कार्यकर्त्यावर लक्ष ठेवा. समोरची व्यक्ती त्याचा फायदा घेऊन तुम्हाला काहीतरी वाकडे बोलण्याची शक्मयता आहे. विद्यार्थीवर्गाला यंदाच्या परीक्षेत ग्रहांचा चांगला पाठिंबा आहे. शब्द जपून वापरा.


तुळ

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग व चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे.  जवळचे मित्र, आप्तेष्ट यांच्यासाठी दगदग सहन करावी लागेल. गुढीपाडवा हा नव्या संवत्सराचा आरंभ असतो. प्रगतीची गुढी त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकजण उभारण्याचा प्रयत्न करत असतो. राजकीय, सामाजिक कार्यात नवा कार्यारंभ होऊ शकेल. तूर्तास थोडा संयम ठेवा. जास्त आक्रमक व उत्साही न होता कार्याची आखणी करा. धंद्यात लक्ष द्या. व्यवहारात भावना आणू नका.


वृश्चिक

तुमचा उत्साह वाढवणारी घटना गुढीपाडव्यादिवशी घडू शकते. मोठे मतभेद व वाद मिटवण्याचा प्रयत्न करा, बुध, शुक्र युती व सूर्यचंद्र लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवारी अडचणी येतील. प्रवासात घाई नको. राजकीय- सामाजिक कार्यात वरि÷ांचे प्रोत्साहन तुम्हाला राहील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कोर्टाच्या कामात एखादा उपाय शोधता येईल. संसारात सुखाचे क्षण अनुभवास येतील.


धनु

बुध, शुक्र युती व सूर्य मंगळ केंद्रयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. मानसिक तणाव राहील. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. धंद्यात वाढ करता येईल. संसारातील समस्या एकमेकांच्या सहमतीने सोडवता येतील. कला, क्रीडा क्षेत्रात तुमची चमक दिसून येईल. कोर्टाच्या कामात गुरुवार, शुक्रवारी चूक होण्याचा संभव आहे. रागावर नियंत्रण ठेवा. वाटाघाटी करताना तुमच्यावर आरोप होण्याचा संभव आहे.


मकर

चंद्र, गुरु प्रतियुती व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या मदतीला मोठी व्यक्ती उभी राहील. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने व नियोजनबद्ध कार्य करा. तुमची जिद्द उपयुक्त ठरेल. कोर्टाच्या कामात जवळच्या व्यक्तीचे सहाय्य मिळू शकेल. मैत्री वाढेल. संसारातील दुरावा कमी होईल. गुढीपाडव्याच्यादिवशी नवकार्याचा प्रारंभ करा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. वाद जास्त ताणू नका. परदेशात नोकराची संधी मिळेल.


कुंभ

अडचणीत आलेली व रेंगाळत पडलेली कामे लवकर पूर्ण करण्याची तयारी ठेवा. बुध, शुक्र युती व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी एखाद्या कलात्मक कार्याचा शुभारंभ करू शकाल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. दूर गेलेले जुने मित्र, आप्तेष्ट नव्याने जोडले जातील. राजकीय, सामाजिक कार्यात मोठय़ा स्वरुपात नावलौकीक मिळेल, असे कार्य हातून होऊ शकते. संतती विषयी शुभ समाचार मिळेल.कोर्टकेस जिंकाल.


मीन

धंद्यात अडचणी असल्या तरी प्रतिसाद मिळेल. तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे व जळणारे लोक सहवासात येतील. बुध, शुक्र युती व चंद्र, मंगळ त्रिकोणयोग होत आहे. नम्रता व संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याची संधी मिळेल. माणसे ओळखून ठेवा, म्हणजे पुढील काळात त्याचा उपयोग करून घेता येईल. कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल. घरातील ताण कमी होतील. पैसा खर्च करताना विचार करा.