|Monday, October 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » सध्या शिकारीचीच चर्चा

सध्या शिकारीचीच चर्चा 

सिनेप्रेमींच्या पारंपरिक संवेदनांना मराठी चित्रपट शिकारीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवडय़ात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची जिज्ञासा निर्माण केली आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे सादरीकरण केले आहे. त्यामुळे ही जिज्ञासा अधिकच ताणली गेली. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे.

महेश मांजरेकर यांचे चित्रपट हे वैविध्यपूर्ण कथानकासाठी ओळखले जातात तसेच ते एक वेगळी वाट चोखाळतात. त्याचमुळे मग शिकारी हा चित्रपट एक हास्यपट आहे की सेक्स कॉमेडी आहे की एक गंभीर सामाजिक नाटय़ आहे याबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता आहे. नेहा खान या पदार्पण करणाऱया अभिनेत्रीचा कमनीय बांधा आणि तिने या टीजरमध्ये साकारलेल्या अदा यामुळे रसिकांना अधिकच प्रश्नांकित केले आहे. हा चित्रपट म्हणजे नेहमीप्रमाणे एक बोल्ड चित्रपट असेल की त्याचा गाभा अगदीच वेगळा असेल की मग मराठीतील हा एक अभूतपूर्व असा हा चित्रपट असेल याबद्दल रसिकांमध्ये चर्चा रंगत आहे. तसे प्रश्नच या चित्रपटाबद्दल विचारले जाऊ लागले आहेत. ‘शिकारी’ या चित्रपटात नेहा खान हिने मध्यवर्ती भूमिका पार पाडली असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेटच्या विजय पाटील यांनी त्याची निर्मिती केली आहे.

Related posts: