|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गिरनार पर्वतारोहण परिक्रमा म्हणजे चैतन्याची लहर

गिरनार पर्वतारोहण परिक्रमा म्हणजे चैतन्याची लहर 

बेळगाव / प्रतिनिधी

दत्त प्रभुंनी 12 हजार वर्षे तप केलेल्या गिरनार पर्वतारोहणाची परिक्रमा म्हणजे चैतन्याची लहर आहे. सुमारे 10 हजार पायऱया आणि सुमारे 42 कि. मी. ची ही परिक्रमा करण्याची प्रथा आहे. गिरनार पर्वतारोहण म्हणजे जाज्वल्य अनुभव आहे. असे प्रतिपादन दत्त भक्त प्रमोद केणे (अलिबाग) यांनी केले.

गिरनार पर्वताच्या 190 पेक्षाही जास्त पौर्णिमावारी करणारे प्रमोद केणे यांच्या गिरनार पर्वतारोहणाच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. लोकमान्य रंगमंदीर येथे झालेल्या या कार्यक्रमात केणे यांनी गिरनार हे चैतन्यमय स्थान असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनेक घटनांचा यावेळी उल्लेख केला. गिरनार पर्वतारोहण करून दत्त पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य कशामुळे प्राप्त झाले याचेही त्यांनी विवेचन केले.  या पर्वतावर जाताना अहंकार आणि मी पणाला अजिबात  थारा नाही. गिरनारची अनुभुती विलक्षणीय असून, नोव्हेबर ते डिसेंबर म्हणजेच दिवाळीनंतर गिरनार पर्वतारोहणासाठी योग्य कालावधी असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे 3 डोंगर चढून गेल्यानंतर आणि अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करून गिरनार येथील गुरू शिखरावर पोहोचल्यानंतर पवित्र दत्त पादुकांचे दर्शन प्राप्त होते. वाटेत 4 हजार पायऱयांवर नेमिनाथ भगवान, अंबाजी मंदिर (आदिशक्ती माया), गोरक्षनाथ शिखर, दत्तधुनी आश्रम पार करावा लागतो. यानंतर गुरूशिखरावरील दत्त महाराजांचे चरणकमल पाहण्याचे भाग्य मिळते, असे प्रमोद केणे यांनी सांगितले.

मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगावतर्फे गुढी पाडव्यानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रदीप कुलकर्णी आणि नितिन कपिलेश्वरकर यांच्या हस्ते प्रमोद केणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश बापट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Related posts: