|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वर, तवंदी, सौंदलगा, मांजरी, कुन्नूर परिसरात गुढीची पूजा :

संकेश्वर, तवंदी, सौंदलगा, मांजरी, कुन्नूर परिसरात गुढीची पूजा : 

प्रतिनिधी / निपाणी

 पांरपरिक आणि मोठय़ा उत्साहात गुढीपाडवा सण निपाणी, संकेश्वर, तवंदी, सैंदलगासह ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाच्या मुहूर्तावर बहुतांशी ठिकाणी गुढी उभारण्यात आली. यानंतर दिवसभर देवालयामध्ये नैवेद्य अर्पण करण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे सर्वत्र मांगल्याचे वातावरण दिसून आले.

निपाणी येथील कुंभार गल्लीत प्रेंडस ग्रुपच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामूहिक गुढी उभारण्यात आली. रेणुका मंदिरासमोर ही गुढी उभारण्यात आली. यावेळी सनातनचे सुनील वाडकर उपस्थित होते. वाडकर यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे महत्व विशद केले. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांच्या वधाचा संबंध गुढी पाडव्याशी जोडून गुढी उभारण्याच्या पारंपरिक प्रथेपासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा सण उत्साहात साजरा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कुंभार गल्लीतील सर्व युवक, महिला, नागरिक उपस्थित होते.

घट्टे गल्लीत सार्वजनिक गुढी

येथील घट्टे गल्लीत गणेश मंदिरासमोर सार्वजनिक गुढी उभी करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुढी पाडव्याची पार्श्वभूमी व महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आरती व प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी राजू बुडके, संजय पांगिरे, मोहन भोई, रविंद्र लाड, महादेव भोई, सचिन बिडकर, मनोहर भोई, बबन ढवळे, विवेक भोई, सनी पांगिरे, संतोष खराडे, सुमित पांगिरे, राजेश घरे, प्रविण घटे यांच्यासह महिला, नागरिक उपस्थित होते.

संकेश्वरात गुढीपाडवा उत्साहात

संकेश्वर  : शहरासह परिसरात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.  घरोघरी गुढी उभी करुन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कडुनिंबाचे सेवन करण्यात आले. नागरिकांनी परिसरातील देवांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून दर्शन घेतले. येथील भक्तांकडून कावड पूजा करण्यात आली. महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ातील श्रीक्षेत्र शिंगणापूर येथे दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त दररोज बारा दिवस वार्षिक यात्रा भरविली जाते. त्या पार्श्वभूमीवर येथील शिवभक्तांकडून येथे कावड पूजा व कोळेकर गल्लीत लोहार यांच्या घरी परंपरेनुसार कावड पूजा केली जाते.

Related posts: