|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळ पं. स. सरपंच समिती स्थापन

कुडाळ पं. स. सरपंच समिती स्थापन 

उपसभापती पदसिद्ध अध्यक्ष : पंधरा सरपंचांचा समावेश

प्रतिनिधी / कुडाळ:

 कुडाळ पंचायत समितीने सरपंच समितीची स्थापना केली आहे. या समितीत लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने व चढत्या क्रमाने अशा एकूण 15 सरपंचांचा समावेश आहे. पंचायत समितीचे उपसभापती हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 77 (अ) नुसार कुडाळ गटातील सरपंच समितीची ही रचना करण्यात आली आहे. कुडाळ पंचायत समितीच्या गटात येणाऱया सर्व ग्रामपंचायतींमधून लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या व लोकसंख्येच्या चढत्या क्रमाने असलेल्या ग्रामपंचायती मिळून 15 ग्रामपंचायतींची ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

 या समितीत सरपंच पुढीलप्रमाणे आहेत- निर्मला पालकर (पिंगुळी), धनंजय उर्फ शेखर गावडे (नेरुर देऊळवाडा), जोसेफ डॉन्टस (माणगाव), प्रिती देसाई (ओरोस), संगीता परब (कसाल), भिकाजी उर्फ बाळा कोरगावकर (पावशी), राजश्री घावनळकर (घावनळे), उमेश धुरी (साळगाव), नागेश आईर (तुळसुली क. नारुर), प्रजेश धुरी (नानेली), रुपेश वाडेकर (कवठी), मंजिरी करंदीकर (निरुखे),  प्रणिता नाईक (आंबडपाल), गुरुनाथ चव्हाण (मुळदे), आत्माराम सावंत (पुळास)  असे एकूण 15 सरपंच या समितीत आहेत. ही समिती समंत्रक व सल्लागार संस्था असेल. ग्रामपंचायतीच्या नियंत्रण व पर्यवेक्षकविषयक कामांबाबत ही समिती पंचायत समितीला सल्ला देईल. पंचायत समितीने या समितीच्या सल्ल्याचा विचार करावा, अशी तरतुद आहे. या समितीला नुकत्याच झालेल्या पं. स.च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या समितीची महिन्यातून एकदा सभा होणार आहे. समितीचा कार्यकाल वर्षाचा आहे. या समितीचे सचिव म्हणून गटविकास अधिकाऱयांनी आदेश केलेले विस्तार अधिकारी काम पाहणार आहेत.