|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रशिक्षक ग्रेगरी यांच्या करारात वाढ

प्रशिक्षक ग्रेगरी यांच्या करारात वाढ 

वृत्तसंस्था / चेन्नाई

इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया चेन्नईन एफसी संघाचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांच्या करारामध्ये एक वर्षांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघाचे सह मालक विटा दाणी यांनी रविवारी ही माहिती दिली.

चेन्नईन एफसी संघाबरोबरचे जॉन ग्रेगरी यांचा प्रशिक्षकपदाचा करार 2018 च्या हंगामानंतर समाप्त झाला होता पण चेन्नईन संघाने ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. या घटनेमुळे ग्रेगरी यांच्या प्रशिक्षकपदाच्या करारामध्ये एक वर्षांची वाढ करण्याचा निर्णय या संघाच्या फ्रांचायजीने घेतला.