|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » केवळ पाच टक्के भारतीय उद्योजकतेत यशस्वी

केवळ पाच टक्के भारतीय उद्योजकतेत यशस्वी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान मोदी यांनी देशातील तरुणांना नोकरी करण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले होते. मात्र सरकारच्या प्रयत्नानंतरही देशात स्वतःचा व्यवसाय करणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे आव्हानदायक असल्याचे समोर आले. रोजगाराच्या मुद्यावर सध्या अडचणीत आलेले सरकार व्यावसायिक अधिक निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नवीन आकडेवारीनुसार देशातील अत्यंत कमी लोक व्यवसायात यशस्वी होतात. ग्लोबल आत्रपन्योरशिप मॉनिटर इंडियाच्या अहवालात 2016-17 मध्ये देशातील 11 टक्के लोक व्यवसाय क्षेत्रात संबंधित होते. यापैकी पाच टक्के लोकांना आपल्या क्षेत्रात यशस्वी होता आले.

उद्योजकतेबाबत भारत अजूनही मागे असून जगात शेवटी असणाऱया देशांच्या यादीत भारताचा समावेश होतो. देशात नवीन उद्योग सुरू करत बंद करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपला व्यवसाय बंद करणाऱयांचे प्रमाण 26.4 टक्के आहे. उद्योग क्षेत्रातील घटनांची माहिती मिळविण्यासाठी या सर्वे करण्यात आला होता.

लोकसंख्येच्या 4 टक्के लोकांनी उद्योजक बनण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. या वर्गाकडून सक्रियपणे व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातील 7 टक्के उद्योजक अशा क्षेत्रात आहेत, ते बंद झाल्यास साडेतीन वर्षांपेक्षा कमी वेळ झाला आहे. देशातील पाच टक्के उद्योजक आपल्या व्यवसायात यशस्वी होतात. 42 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत आपला व्यवसाय यशस्वीपणे राबविल्यांना उद्योजक समजण्यात आले आहे.

ब्रिक्स देशांमध्ये यशस्वी उद्योजकतेचे प्रमाण सर्वाधिक असून ते 17 टक्के आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक कमी असून ते 3 टक्के आहे. चीनमध्ये व्यवसाय करणाऱयांची संख्या 8 टक्के आहे. रशिया आणि भारत दोघांचेही प्रमाण प्रत्येकी पाच टक्के आहे. व्यवसाय सुरू करण्यात आल्यानंतर बंद करण्याची अनेक कारणे देण्यात आली आहेत.

1.3 टक्के प्रकरणात सरकारी लालफितीमुळे व्यवसाय बंद केल्याचे म्हटले. सात टक्के प्रकरणात आर्थिक समस्या निर्माण झाली, तर 6.5 टक्के प्रकरणात खासगी कारण सांगण्यात आले. अजूनही भारतीयांसाठी व्यावसायिक बनणे आव्हान आहे.

 

Related posts: