|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » लवकरच बांधकाम क्षेत्रासाठी पर्यावरण नियम होणार सुलभ

लवकरच बांधकाम क्षेत्रासाठी पर्यावरण नियम होणार सुलभ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांधकाम क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. नवीन निर्णयानुसार 50 हजार चौरस मीटरपेक्षा कमी आकार असणाऱया प्रकल्पांना पर्यावरण प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देण्यात आल्यानंतर बांधकामास मंजुरी मिळाल्याचे समजल्यास येईल. हर्षवर्धन यांच्याकडील पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात येईल. 2006 च्या अधिसूचनेनुसार 20 हजार चौरस मीटरपेक्षा जास्तच्या बांधकामाला पर्यावरण मंजुरी घेणे आवश्यक आहे. मोदी सरकारने डिसेंबर 2016 मध्ये ही मर्यादा 3 लाख चौरस मीटरपर्यंत कमी केली.

 

Related posts: