|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » सुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिजचे 350 डी मॉडेल सादर

सुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिजचे 350 डी मॉडेल सादर 

वृत्तसंस्था / बेंगळूर

मर्सिडिज बेन्झचे अधिकृत विपेता असणाऱया सुंदरम मोटर्समध्ये मर्सिडिज बेन्झ एस क्लास 350 डी हे मॉडेल दाखल झाले आहे. सुंदरम मोटर्स हा टी. व्ही. सुंदरअयंगार ऍण्ड सन्सचा विभाग असून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सेवा देण्यात येते. कंपनी गेल्या सहा दशकांपासून वाहन उद्योग क्षेत्रात असून बेंगलोर क्लब या ठिकाणी 2001 आणि तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये 2003 पासून मर्सिडिज बेन्झची सेवा पुरविण्यास प्रारंभ करण्यात आला.

मर्सिडिज बेन्झचे एस क्लास 350 डी हे मॉडेल देशातील बीएस सहा नियमावली पूर्ण करणारे पहिले ठरले आहे. पूर्ण भारतीय बनावटीचे मॉडेल भारतातच विक्री करण्यात येणार आहे. भारतात बीएस 6 नियमावली लागू करण्याच्या दोन वर्षे अगोदरच कंपनीकडून हे अत्याधुनिक मॉडेल सादर करण्यात आले आहे. मर्सिडिज बेन्झकडून देशात आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या कार मॉडेलमध्ये सर्वात शक्तिशाली असणाऱया या इंजिनात उत्सर्जन कमी झाल्याचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.

 

Related posts: