|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » उद्योग » ‘अविश्वासा’मुळे बाजाराने तेजी गमावली

‘अविश्वासा’मुळे बाजाराने तेजी गमावली 

बीएसईचा सेन्सेक्स 253, एनएसईचा निफ्टी 101 अंशाने कमजोर

वृत्तसंस्था/ मुंबई

मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने त्याचे परिणाम भांडवली बाजारावर दिसून आले. सेन्सेक्स 0.75 टक्के आणि निफ्टी 1 टक्क्याने घसरत बंद झाले. निफ्टी 10,200 च्या खाली स्थिरावला, तर सेन्सेक्स 33 हजाराच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली उतरला. दिवसातील कमजोरीदरम्यान निफ्टी 10,075 आणि सेन्सेक्स 32,856 पर्यंत खाली आला होता. सुरुवातीची 200 अंशाची तेजी सेन्सेक्सने गमावली.

मिडकॅप, स्मॉलकॅप समभागातही विक्री दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.6 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.7 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 2 टक्क्यांनी कोसळला.

बीएसईचा सेन्सेक्स 253 अंशाने घसरत 32,923 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 101 अंकाने घसरत 10,094 वर बंद झाला. बँक निफ्टी 1 टक्क्यांनी कमजोर होत 24,245 वर बंद झाला.

धातू, बँकिंग, आयटी, वाहन, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू समभागात जोरदार विक्री झाली. निफ्टीचा धातू निर्देशांक 2.7 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 2.6 टक्के, आयटी निर्देशांक 2.2 टक्के, वाहन निर्देशांक 0.7 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा रिअल्टी निर्देशांक 3 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1.5 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 1.7 टक्क्यांनी कमजोर झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

एनटीपीसी, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड, एल ऍण्ड टी, हिंदुस्थान युनि 1.3-0.8 टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, बीपीसीएल, कोल इंडिया, विप्रो, येस बँक 4.25-2.6 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात वक्रांगी, जीई टी ऍण्ड डी, एनएलसी इंडिया, नाल्को, टाटा कम्युनिकेशन्स 5-0.6 टक्क्यांनी वधारले. सेन्ट्रल बँक, आयडीबीआय बँक, जेएसडब्ल्यू एनर्जी, सेल, अदानी पॉवर 7.5-4.6 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅपमध्ये शिल्पा, एचईजी, केल्टन टेक, डीआयसी इंडिया 7.4-4.7 टक्क्यांनी वधारले.

 जेबीएफ इन्डस्ट्रीज, टीव्ही टुडे, किर्लोस्कर ब्रदर्स 20-8.2 टक्क्यांनी घसरले.