तब्बल साडेतीन तासानंतर रेलरोको आंदोलन मागे

ऑनलाईन टीम / मुंबई :
रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात ऍप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, ऍप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत होते. मात्र तब्बल साडेतीन तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर सकाळी साडेसात वाजल्यापासून ठिय्या मांडला होता. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱया एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. ऍप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. मात्र तब्बल साडेतीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.