|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » इरकामध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज

इरकामध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू : सुषमा स्वराज 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

इराकमध्ये इसीस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.राज्यसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

चार वर्षांपूर्वी मोसुलमधून या भारतीयांचे अपहरण झाले होते. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. इसीसने 2014मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचे अपहरण करून ओलीस ठेवले होते. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच इसीसने त्यांचे अपहरण केले होते. मृत्यांमधील 31 जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत.

 

 

Related posts: