|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्वरांजलीच्या सुरेल सुरावटींनी आजऱयात मराठी नववर्षाचे स्वागत

स्वरांजलीच्या सुरेल सुरावटींनी आजऱयात मराठी नववर्षाचे स्वागत 

प्रतिनिधी/ आजरा

संतवाणी, भाव आणि भक्ती गीतांच्या सुरेल स्वरांनी आजऱयात गुढीपाडव्याची पहाट उजाडली. मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त आजरा सूतगिरणी व येथील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूतगिरणीचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस व स्वरसाधना संगीत विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्रबुवा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, आण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी तसेच पुणे येथील कुमार हिरे व अनुराधा हिरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व गुढीचे पूजन करण्यात आले. यानंतर पहाटे 5.30 वाजता स्वरांजली कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात भावगीत आणि भक्ती गीत गायन करण्यात आले. उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.

मच्छिंद्रबुवा, रसिका हिडदुग्गी, सानिया मुंगाटे, संस्कृती कांबळे, श्रीया पाटोळे, समृद्ध कांबळे, निगेश देवर्डे, पियुष पाटील, विठ्ठल पाटील, अनिकेत पाटील, चंदशेखर फडणीस, अभिजित चव्हाण, अमोघ वाघ, सचिन सटाले, विष्णू पोवार, राजेंद्र धुमाळ, आर. ए. पाटील, संजय आडाव, डॉ. डिसोझा, महादेव कोगले, राहुल बागडी, ओंकार पाटील, अर्नव बुवा, अभिषेक देशपांडे या गायकांनी यामध्ये विविध गाणी गायिली. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन चंद्रशेखर फडणीस, सौ. निलांबरी फडणीस, स्वरदा फडणीस यांनी केले. अभिजित चव्हाण यांनी सिंथेसायझर तर हरी गाडगीळ यांनी हार्मोनियम साथ देत संगीत साथ दिली.