|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रभाग रचनेत कुपवाड शहराचे तीन तुकडे

प्रभाग रचनेत कुपवाड शहराचे तीन तुकडे 

तीन प्रभागात विभागला कुपवाड परिसर: आरक्षणात उपमहापौर विजय घाडगे

दरिकांत माळी / कुपवाड

दोन महिण्यावर येवुन ठेपलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा व आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. मनपा क्षेत्रातील 20 प्रभागांसाठी 78 नगरसेवकांचे आरक्षण ड्रॉ पद्धतीने निश्चित करण्यात आले. नव्या प्रारुप आराखडय़ात सुमारे 70 हजार लोकसंख्या असलेल्या कुपवाड शहराचे तीन तुकडे झाले असुन यामध्ये क्रमांक एक, दोन व आठ असे एकुण तीन प्रभाग पडले आहेत. शहराच्या गावभागाचा परिसर वगळता पुर्वेचा व दक्षिणेचा काही भाग मिरजेला तर पश्चिम व दक्षिणेचा काही भाग सांगलीला जोडला असुन उत्तरेचा परिसर नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. नवी प्रभाग रचना सर्वच इच्छुकांना अडचणीची ठरणार असुन उमेदवारांची ‘झुंज’ पहायला मिळणार आहे.

 नवा प्रभाग आराखडा व आरक्षण सोडतीत कुपवाड परिसरांतुन माजी उपमहापौर प्रशांत पाटील, धनपाल खोत, विष्णु माने व गजानन मगदुम आदी विद्यमान नगरसेवक बचावल्याने त्यांचा जीव भांडय़ात पडला. त्यांना सोयीस्कर व काहीअंशी वाढीव भाग मिळाला आहे. तर आरक्षणात दांडी उडाल्याने विद्यमान उपमहापौर विजय घाडगे व विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते हे दोघे मातब्बर सोयीस्कर प्रभागाअभावी अडचणीत सापडले आहेत. त्यांना शेजारच्या खुल्या प्रवर्गातुन निवडणुक लढवावी लागणार आहे. आगामी निवडणुकीत कुपवाड परिसरांत तुल्यबळ काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच भाजपा, शिवसेना, जनता दल व सुधार समिती यांच्यात चुरशीच्या लढती होण्याची दाट शक्यता असुन राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 नव्या प्रभाग आराखडय़ानुसार कुपवाडमधील प्रभाग एकमध्ये प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट, भारत सुतगिरणी, अहिल्यानगर, विजयनगर, वसंतनगर, यशवंतनगर, आंबाचौक व बुधगाव रोड आदी भागांचा समावेश असुन या प्रभागासाठी अनु.जाती पुरुष, सर्वसाधारण पुरष, ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. या प्रभागात सध्या नगरसेवक प्रशांत पाटील, धनपाल खोत, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर मोहन जाधव, माजी नगरसेवक किरण सुयर्ववंशी, शेडजी मोहिते, नगरसेविका सौ.गुलजार पेंढारी इच्छुक आहेत. या प्रभागात 28,056 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कुपवाड गावठाणसह शांत कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, दुर्गानगर, विद्यासागर कॉलनी, माळवाडी, लेप्रसी कॉलनी, मेघजीभाईवाडी, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, नवनाथनगर ते मिरज-पंढरपुर रोडची पश्चिम बाजुचा समावेश असणाऱया दोन नंबर प्रभागात अनु.जाती महिला, ओबीसी महिला व सर्वसाधारण पुरुषांसाठी दोन जागा आहेत. या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक गजानन मगदुम, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, लिंगायत समाजाचे नेते रविंद्र पाटील, काँग्रेसचे निलेश साखरे, सौ.सविता मोहिते, वंदना सायमोते, नगरसेविका सुरेखा कांबळे यांची तयारी सुरु आहे. यामध्ये एकुण 25,279 मतदार आहेत. तर प्रभाग आठमध्येही अनु.जाती महिला, ओबीसी महिला तसेच सर्वसाधारण पुरुषांसाठी दोन जागा आहेत. या प्रभागात वानलेसवाडी, विजयनगर पुर्व-पश्चिम, सैनिकनगर, विकास कॉलनी, विलींग्डन व चिंतामन कॉलेज, वानलेस चेस्ट व भारती हॉस्पीटल, विनायकनगर, विकास कॉलनी, गंगानगर, अष्टविनायकनगर, क्रांतीसिंह नाना पाटील सोसायटी, आंबेडकर सोंसायटी, गुरुकृपा व अजंठा कॉलनी, वीजवितरण व कुपवाडचे मनपा कार्यालय आदी भागांचा समावेश आहे. या प्रभागात आरक्षण मिळाले नसले तरी सोयीस्कर प्रभाग आल्याने विद्यमान नगरसेवक विष्णु माने, नगरसेविका सौ.स्नेहा औंधकर, भाजपाच्या सौ.कल्पना कोळेकर आदी इच्छुक असुन या प्रभागात एकुण 24,201 मतदार आहेत. एकुणच विद्यमान नगरसेवकांविरोधात निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावल्याने आगामी निवडणुक संघर्षमय होण्याची चिन्हे आहेत. कुपवाड शहरातील राजकीय हालचाली चागंल्याच गतिमान झाल्या आहेत. कुपवाड परिसरांत आगामी महापालिका निवडणुक सरळसोपी जाणार नसुन चुरशीची होण्याची शक्यता आहे.