|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » अहमदनगरमध्ये मारूती कुरिअरच्या कार्यालयात स्फोट

अहमदनगरमध्ये मारूती कुरिअरच्या कार्यालयात स्फोट 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

अहमदनगरच्या माळीवाडय़ातील मारूती कुरिअरच्या एका पार्सल बॉक्समध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली. यात दोन जण जखामी झाले असून काल रात्री दहा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला.

हे पार्सल पुण्यातील सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे असल्याची माहिती असल्याचे उघडकीस आले असून अहमदनगर पोलिस नहार यांच्या चौकशीसाठी निघाले आहेत.या स्फोटात संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर हे जखमी झाले. संदीपच्या चेहऱयाला दुखापत झाली, तर संजयच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात. दोघांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुरिअरच्या पार्सलमधील स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱया रंगाची पावडर होती. या पांढऱया रंगाच्या पावडरचा स्फोट झाल्याने दोघांना दुखापत झाली. स्फोटाने संजय क्षीरसागरच्या हाताच्या बोटात आणि पायात पाईपचे धातू घुसले आहेत.

 

 

 

 

Related posts: