|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीरियातील इदलिबमध्ये हवाई हल्ले, 20 जण ठार

सीरियातील इदलिबमध्ये हवाई हल्ले, 20 जण ठार 

बैरुत :

सीरियाच्या इदलिब प्रांतात गुरुवारी एका शाळेनजीक झालेल्या हवाई हल्ल्यात 16 मुलांसमवेत 20 जणांना जीव गमवावा लागला. कफ्र बातिख भागात झालेल्या या हल्ल्यात मारले गेलेल्या मुलांचे वय 11 वर्षांपेक्षाही कमी होते. अध्यक्ष बसर-अल-असाद यांचे सैन्य का रशियाने हा हल्ला केला अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. दहशतवादी संघटना हयात तहरीर अल-शामच्या एका तळानजीक हा हल्ला करण्यात आला. या संघटनेत अल-कायदाचे समर्थन प्राप्त गटाचे माजी सदस्य सामील आहेत. शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी या हल्ल्याच्या तावडीत सापडल्याची माहिती सीरियन मानवाधिकार संघटनेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी दिली. 7 दिवसांच्या कालावधीत दुसऱयांदा शालेय मुले हवाई हल्ल्यांचे शिकार झाले आहेत. शुक्रवारी एका शाळेच्या तळघरात आश्रय घेतलेल्या 15 मुलांचा आणि दोन महिलांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. 2011 मध्ये असाद सरकारविरोधी हिंसक निदर्शनांपासून देशात गृहयुद्ध सुरू आहे. या हिंसाचाराता आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिकजण मारले गेले आहेत.