|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » गृहमंत्र्यांच्या भारतीय राष्ट्रकुल संघाला शुभेच्छा

गृहमंत्र्यांच्या भारतीय राष्ट्रकुल संघाला शुभेच्छा 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय पथकाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग तसेच राज्य गृहमंत्री किरण रिजिजु यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय ऑलिंपिक संघटनेतर्फे गुरूवारी येथे आयोजित केलेल्या समारंभाला गृहमंत्री राजनाथ सिंग आणि राज्य गृहमंत्री रिजिजु उपस्थित होते. या स्पर्धेसाठी भारताचे 222 जणांचे पथक शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ही स्पर्धा 4 ते 15 एप्रिल दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय पथक चांगली कामगिरी करून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर उज्ज्वल करतील, असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले असून या स्पर्धेसाठी भारतीय पथकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. या समारंभावेळी भारताच्या राष्ट्रकुल पथकासमवेत गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे फोटो काढण्यात आले. या समारंभाला भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि सचिव राजू मेहता उपस्थित होते. केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन सिंग राठोड हे बेंगळूरच्या दौऱयावर असल्याने ते या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारताने आपली कामगिरी दर्जेदार केली आहे. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले होते.