|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » दोन मुलींना वीष पाजून आईची आत्महत्या

दोन मुलींना वीष पाजून आईची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

कौटुंबिक वादातून एका महिलेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड गावात गुरूवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

श्यामल गणेश यरकळ असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून घरात झालेला वादाचा राग मनात धरून श्यामल यांनी हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे. श्यामन यांनी तीन वर्षाच्या आराध्याला आणि दुसऱया मुलीला विष पाजवे. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. गंभीर अवस्थेत असलेल्या दोन्ही मुलींना रूग्णलयात दाखल करण्यात आले पण अराध्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला तर दुसरी मुलगी अस्वस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.