|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » अघोरी बाबाचा अनोखा उपवास

अघोरी बाबाचा अनोखा उपवास 

ऑनलाईन टीम / अमरावती

अमरावतीमध्ये एका अघोरी बाबाचा अनोखा उपवास केल्याचे समोर आले आहे. बाभळीच्या काटय़ावर झोपून या बाबाने तब्बल दीड दिवस अघोरी उपवास केला आहे. मनिराम बाबा असे या अघोरी बाबांचे नाव आहे.

अमरावती जिल्हय़ातील धारणी गावात ही घटना घडली. बाभळीच्या काटय़ांवर झोपून उपवास करणाऱया बाबाचे नाव मनिराम बाबा असे आहे. गावातील कालीका मातेच्या मंदिरात ते पुजाअर्चा करतात. या बाबाने बाभळीच्या काटय़ांवर झोपून उपवासाला सुरूवात केली होती. एवढेच नाही तर बाबाने पोटावर दिवादेखील ठेवला होता. परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना काटय़ावरून उतरण्यास भाग पाडले. उपवासावेळी मध्यप्रदेश आणि मेळघाट परिसरातील काही लोकही उपस्थित होते.

 

Related posts: