|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » अन्…महापौर गेटबाहेर ताटकळत राहिले

अन्…महापौर गेटबाहेर ताटकळत राहिले 

ऑनलाईन टीम / पुणे

पुण्यात पे अँड पार्कचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील पार्किंग पॉलिसी करण्यासाठी आज महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. पण विरोधकांच्या गेटबंद कारभारामुळे महापौरांनाच गेटबाहेर ताटकळत रहावे लागले आहे.

पार्किंग पॉलिसीला भाजप वगळता विविध राजकीय पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांचा विरोध सुरू असतांना, आज याच विषयावर सर्वसाधारण सभा असल्याने महापालिकेबाहेर जोरदार आंदोलन सुरू होते. सुरक्षेचा विचार करून सुरक्षारक्षकांनी महापालिकेची प्रवेशद्वार बंद केली. महापालिकेचे गेट बंद केल्याने महापौर मुक्ता टिळक यांना काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. तर सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना नगरसेवकांनी काळे शर्ट आणि काळय़ा टोप्या घालून पे ऍन्ड पार्कच्या धोरणाला विरोध दर्शवला.