|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सिद्धेश्वर दर्शनासाठी लोटला जनसागर

सिद्धेश्वर दर्शनासाठी लोटला जनसागर 

वार्ताहर/ काकती

येथील जागृत देवस्थान सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी हजारो भाविक काकतीत दाखल झाले हेते. शुक्रवारी सायंकाळी इंगळय़ांच्या धार्मिक विधीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

गुरुवारी सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला. हिरेमठ स्वामी यांच्या सान्निध्यात हक्कदार, देवस्थान पंचांच्या उपस्थितीत पालखी सोहळा व पूजाअर्चा झाली. यावेळी गाऱहाणा घालण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास आंबिल गाडय़ांची घरोघरी सुवासिनींनी पंचारती केली. सवाद्य प्रदक्षिणा झाल्यानंतर आंबिल-घुगऱयांचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला.

गुरुवारी रात्री 9 वाजल्यानंतर शोभागाडय़ांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. गावातील सर्व गल्ल्यांमध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक गल्लीतील नागरिकांनी आकर्षक विद्युत रोषणाईने गाडे सजविले हेते.

इंगळय़ांचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात

शुक्रवारी सायंकाळी इंगळ्य़ांचा कार्यक्रम झाला. हिरेमठ स्वामींचे सवाद्य मिरवणुकीने मंदिरामध्ये आगमन झाले. यावेळी स्वामीजींची पाद्यपूजा झाली. त्यानंतर ‘हर हर महादेव’च्या गजरात इंगळ्य़ांचा धार्मिक विधी पार पडला. यावेळी भाविकांमध्ये अपूर्व उत्साह होता.

आज खळय़ांच्या कुस्त्या

सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने शनिवार दि. 24 रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन केले असून अष्टगीर आमराईत सायंकाळी 5 वाजता प्रारंभ होणार आहे.

Related posts: