|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडी, कणकवलीत जुगार अड्डय़ांवर छापे

सावंतवाडी, कणकवलीत जुगार अड्डय़ांवर छापे 

अकराजणांवर गुन्हे दाखल

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी सावंतवाडी व कणकवली येथे जुगार अड्डय़ांवर टाकलेल्या छाप्यात 91 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकूण 11 जणांवर मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अवैध धंद्यांवरील कारवाईने वेग घेतला असून एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी शुक्रवारी कणकवली व सावंतवाडी येथील जुगार अड्डय़ांवर छापे टाकले. कणकवली सह्याद्री हॉटेलच्या बाजूलाच टाकलेल्या छाप्यात दीपक पाताडे (51, तेलीआळी कणकवली), राजेंद्र कुंज (50, आंब्रड बाजार), सुरेश कदम (46, नरडवे), लवू राणे (28, नरडवे) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 15 हजार 185 रुपये, आठ हजार 800 रुपयांचे चार मोबाईल, तसेच कल्याण मटका खेळण्याचे साहित्य व अन्य असा एकूण 23 हजार 986 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱया कारवाईत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव बाजारपेठेत टाकलेल्या छाप्यात रवींद्र हरमलकर (43), दीपक जाधव (43), देवानंद धारगळकर (30), प्रकाश मोघे (50), प्रमोद पांढरे (38), राजाराम राऊळ (68), आनंद फेंद्रे (42, सर्व रा. मळगाव-निरवडे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related posts: