|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

शुक्राचे राश्यांतर घरगुती वाद कमी करणारं आहे. जीवनसाथीबरोबर झालेले गैरसमज मिटतील. शेतकरी वर्गाने पीक जरी चांगले काढले तरी त्याला योग्य भाव मिळेल याची हमी देता येणार नाही.  ग्रहांची साथ जरी कमी असली तरी कष्टाने विजयश्री खेचून आणू शकाल. विद्यार्थीवर्गाला परीक्षेत चांगले यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल. वाहन खरेदीचा योग जुळून येईल. मैत्रीमध्ये वितुष्ट येण्याचा योग. वाहन जपून चालवा. महाग वस्तू खरेदी कराल.

वृषभ

नोकरी, धंद्यात थोडय़ा प्रमाणावर गाडी रुळावर येते आणि पुन्हा काही संकटांना तोंड द्यावे लागते, असा काळ चालू आहे. प्रयत्न मात्र सोडू नका. पुढील येणारा काळ चांगला असणार आहे. या आठवडय़ात मात्र सुरुवातीला महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आर्थिक फायदा न बघता काम करण्याची तयारी ठेवा. लोकसंग्रह गोळा करा. शत्रुपक्षाच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवा. गुरुवार व शुक्रवारी प्रकृतीची काळजी घ्या. सर्दी, ताप व पोटदुखीचा त्रास संभवतो.

मिथुन

धंद्यात आर्थिक आवक वाढणार आहे. प्रगतीरथ वेगाने धावणार आहे. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पूर्ण करू शकाल. थोरामोठय़ांचा आशीर्वाद लाभेल. नोकरीत नवीन व चांगली संधी मिळण्याची शक्मयता आहे. गैरव्यवहारात मात्र पडू नका. शुक्रवार व शनिवारी वाहन जपून चालवा. रात्रीचा प्रवास टाळा. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत चांगले यश मिळेल. शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कर्क

आठवडय़ाच्या सुरुवातीला कार्यक्रमात बदल करावे लागतील. घरातील वातावरण थोडे तणावाचे राहण्याची शक्मयता आहे. नाटय़ चित्रपट क्षेत्रातील क्यक्तींना मिळेल ते काम स्वीकारावे लागेल. आर्थिक आवक बुधवारपासून वाढेल. व्यवसायात थोडय़ा प्रमाणात प्रगती संभवते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण प्रश्न सोडवण्याची घाई करू नका. विचारवंतांचा सल्ला घ्या. पुरेसा वेळ जाऊ द्या.  शेतीच्या कामात यश मिळेल. कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवा. नोकरीत  खोटे आरोप होतील.

सिंह

आपला प्रगतीरथ मध्यम गतीने चालत आहे. थोडय़ा अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. प्रेमाची व्यक्ती भेटणार आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. धंद्याला नवे वळण देण्याचा विचार कराल. चांगली बातमी मिळेल. सोमवार व मंगळवारी नोकरीत कामाचा ताण पडेल. घरातील कामांकरिता वेळ देता येणार नाही. दगदग, धावपळ, याचा थोडा त्रास होईल. नातलग मंडळीचा सहभाग मिळेल. प्रवासात लाभ होईल. मित्र भेटतील.

कन्या

शुक्राचे राश्यांतर होत आहे. घरातील कामाची जबाबदारी तुमच्यावर पडण्याची शक्मयता आहे. मुलांच्या हट्टापुढे तुमचे काही चालणार नाही. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी कुणाच्या तरी सल्ल्याची गरज भासेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वकिली थाटात तुम्ही तुमची बाजू मांडू शकाल. शेतकरी वर्गाला पिकांची काळजी घ्यावी लागेल. गुरुवार, शुक्रवारी व्यवसायात फसवणूक होण्याची शक्मयता आहे. नवे वाहन घेण्याचा विचार कराल.

तुळ

उत्साह व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रिय व्यक्तीबरोबर झालेले गैरसमज दूर करता येतील. अहंकार बाजूला ठेवून थोडे नमते घेतले तर मोठी झेप घेता येईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात चांगली प्रगती संभवते. व्यवसायात महत्त्वाच्या भेटीगाठी आठवडय़ाच्या सुरुवातीला करा. शुक्रवार, शनिवार प्रकृतीची थोडी काळजी घ्या. जीवनसाथीचा सल्ला उपयोगी ठरेल. शेतीच्या कामात दिरंगाई करू नका. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत चांगले यश मिळणार आहे. वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येईल.

वृश्चिक

राजकीय- सामाजिक क्षेत्रात जुन्या अनुभवांचा उपयोग करून घेता येईल. अधिकारी तुमची शिफारस चांगल्या कामासाठी करतील. शुक्राचे राश्यांतर थोडे जीवनसाथीबरोबर वाद, गैरसमज निर्माण करणार आहे. कला, क्रीडा क्षेत्रात प्रयत्नांचा जोर वाढवला तरच विजयश्री खेचून आणता येईल. मानसिक, शारीरिक त्रास आठवडय़ाच्या सुरुवातीला होईल. नोकरीत बदल हवा असला तरी आता चांगली संधी मिळेलच, असे नाही. आहे त्यामुळे तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा.

धनु

साडेसाती चालू असल्यामुळे कामातील थोडय़ा अडचणी येत असतील. मात्र या आठवडय़ातील शुक्राचे राश्यांतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे काही निर्णय लोकांना आता खटकणारे असणार आहेत. विद्यार्थीवर्गाला अभ्यासात ग्रहांचा चांगला पाठिंबा आहे. गैरमार्गाने पैसे कमवण्याचा विचार करू नका. मंगळवारी वाद गैरसमज संभवतात.

मकर

भावनेच्या भरात निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. नाटय़ चित्रपट क्षेत्रात कामाचा ताण थोडा वाढणार आहे. शुक्राचे राश्यांतर आठवडय़ाच्या सुरुवातीला कौटुंबिक समस्या निर्माण करणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त हितशत्रूंना चांगला दणका देऊ शकाल. तुमचा दबदबा वाढेल. व्यवसायात आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. नवीन भेटीगाठी संभवतात. विद्यार्थीवर्गाला ग्रहांचा चांगला पाठिंबा आहे. विजयश्री नक्की खेचून आणू शकतील. शेतकरी वर्गाने नवीन तंत्रज्ञान शिकून अधिक उत्पादन कसे काढता येईल. याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ

शुक्राचा मेष राशीत प्रवेश प्रेमप्रकरणात यश मिळून देईल. घरातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. शेतीच्या कामात जास्त लक्ष द्या. मंगळवार, बुधवार प्रकृतीची थोडी काळजी घ्या. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी टाकण्याची शक्मयता आहे. एखादे मोठे पद मिळेल. व्यवसायात आळस करू नका. नवीन ओळखी करा व धंदा कसा वाढविता येईल याचा अभ्यास करा. विचारवंतांचा सल्ला घ्या. घर खरेदी करण्याचे मनात येईल.

मीन

या आठवडय़ात तुमचे निर्णय चुकणार नाहीत. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. कंत्राटदारांच्या अडकलेल्या कामांना गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर झालेले आरोप दूर होतील. आठवडय़ाच्या सुरुवातीला घरगुती वाद, गैरसमज संभवतात. विद्यार्थी वर्गाने जर कष्ट घेतले तर परीक्षेत चांगले यश मिळवता येईल. आक्रमक भूमिका न मांडता सौम्यपणे प्रकरणे हाताळावी तर कामे पूर्ण करू शकाल. प्रवासात दगदग संभवते.

Related posts: