|Friday, August 23, 2019
You are here: Home » leadingnews » अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण मात्र सुरूच

अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण मात्र सुरूच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

जनलोकपालासह अन्य मागण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलनाला बसलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. डॉक्टरांच्या टिमने अण्णांची प्रकृती तपासली असता, उपोषणमुळे त्यांचे वजन घटले असून रक्तदाबही वाढला आहे. तरीही अण्णा उपोषणावर ठाम आहेत.

आंदोलनाच्या तिसऱया दिवशीही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला पहावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज रविवारी आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्मयाचे असेल. मोदींना 43 पत्रे लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे अण्णांनी म्हटले होते. शेतकऱयांसाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा, लाकपाल नियुक्त करा, या सारख्या अन्य मागण्या घेवून अण्णा रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. गेल्या आंदोलनाच्या तुलनेत या वर्षी गर्दी फारच कमी आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोड सुरक्षा व्यवस्था मैदानात तैनाद आहे. अण्णांचे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पाठींब्याविना सुरू आहे. हे आंदोलन देशाच्या हितासाठी असून या विषयी सरकारची बोलणी सुरू आहे, असे अण्णा म्हणाले.