|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » उद्योग » तिकीटसंदर्भातील दंडातून रेल्वेकडून 1097 कोटी वसूल

तिकीटसंदर्भातील दंडातून रेल्वेकडून 1097 कोटी वसूल 

200 कोटी रुपयांनी वाढ होण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱया व्यक्तींना दंड ठोठावत 1,097 कोटी रुपये गोळा केले आहेत. एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत हा दंड जमा करण्यात आला आहे. एकूण रकमेपैकी डिसेंबर अखेरपर्यंत 850 कोटीपेक्षा जास्त दंड गोळा करण्यात आला होता. चालू महिन्यात अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा दंड गोळा होण्याचा अनुमान आहे. 

प्रवाशांनी बेकायदेशीर प्रवास करू नये यासाठी रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेकडून तिकीट तपासणी जोरदार राबविण्यात येत आहे, असे रेल्वे बोर्डचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये 18.18 लाख जणांची तिकीट तपासणी करण्यात आली होती असे रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी राज्यसभेत गेल्या महिन्यात सांगितले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नियमांचे उल्लंघन करणाऱयांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली. फेबुवारी अखेरपर्यंत 3 कोटी लोकांना विनातिकीट पकडण्यात आले होते. विनातिकीट प्रवास करताना पकडण्यास आल्यास मूळ प्रवास भाडे अधिक 250 रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. मुंबईच्या पश्चिम रेल्वेने 143 कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून गेल्या वर्षांच्या तुलनेत 21 टक्के वाढ झाली.