|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » एल्कॉम’च्या शिबिरात 115 जणांचे रक्तदान

एल्कॉम’च्या शिबिरात 115 जणांचे रक्तदान 

कोल्हापूर

क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद दिनानिमित्त एल्कॉम इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमध्ये रक्तदान शिबिर झाले. या शिबिरामध्ये 115 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलन करण्याकरिता जिल्हा रूग्णालय सीपीआर कोल्हापूरच्या कर्मचाऱयांचे सहकार्य मिळाले.

कार्यक्रमास एल्कॉमचे चेअरमन डॉ. गिरीष वझे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी संदीप देसाई, आदित्य कदम, एन. ए. महाजन, अर्चना मुटकेकर, अजित घाटगे, संतोष पवार, अविनाश भाटे, सागर जोके आणि कर्मचारी रणजित पाटील, महेश माने, किशोर सुतार, दीपक मस्कर व महिला कर्मचारी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या.