|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार जितेंद्र देशप्रभु

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार जितेंद्र देशप्रभु 

प्रतिनिधी/ पणजी

शांताराम नाईक यांनी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजिनामाम दिल्याने सध्या ते पद रिक्त आहे. सध्याची काँग्रेसची स्थिती पाहता सर्व पदांचा मान, हक्क दक्षिण गोव्यातील आमदार, उमेदवार यांच्याकडेच असल्यामुळे गोव्यात काँग्रेसचा तोल बिगडत आहे. हा तोल राखण्यासाठी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा मान उत्तर गोव्यालाच मिळाला पाहिजे यासाठी आज दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र देशप्रभू यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 17 उमेदवार निवडून आले असून त्यातले 7 उत्तर गोव्याचे होते. विश्वजित राणे यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने संख्या कमी झाली. उत्तर गोव्याला काँग्रेसने आजपर्यंत प्राधान्य न दिल्याचे चित्र आज दिसून येत आहे त्यामुळे उत्तर गोव्यालाच प्राधान्य दिले आहे असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबद्दल आपण काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांच्याशी बोललो होतो पण त्याच्याकडून सकारात्म अशा पद्धतीची प्रतिक्रिया न आल्याने आता अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे जाण्याचे ठरविले असेही त्यांनी सांगितले.