|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विद्यार्थ्यांनी खेळात सक्रिय राहणे आवश्यक

विद्यार्थ्यांनी खेळात सक्रिय राहणे आवश्यक 

प्रतिनिधी/ निपाणी

आजच्या जागतिकीकरण व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. खेळामुळे शारीरिक सामर्थ्य वाढते. तसेच आरोग्य उत्तम राहते. कोणत्याही खेळात जय, पराजय याला महत्त्व न देता खेळाचा आनंद लुटावा, असे प्रतिपादन सीपीआय एम. पी. सरवगोळ यांनी केले.

येथील व्हीएसएम अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश हुब्बळ्ळी यांनी, मानवी शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत सुरु राहण्यासाठी खेळाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी सीपीआय सरवगोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोमेश बगीटकर याने स्वागत व राणी शास्त्राr हिने प्रास्ताविक केले. यावेळी क्रीडा संचालक शशिराज तेली, प्रा. संतोष हुल्लोळी, क्रीडा शिक्षिका संगीता कराळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. चिन्नम्मा हप्पळी हिने सूत्रसंचालन केले. तर अभिषेक पाटील याने आभार मानले.