|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » कोरेगाव – भीमा हिंसाचारात भिडेंचा सहभाग नाही – मुख्यमंत्री

कोरेगाव – भीमा हिंसाचारात भिडेंचा सहभाग नाही – मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंविरोधात आतापर्यंतच्या चौकशीत एकही पुरावा मिळालेला नाही. भिडेंचा भीमा कोरेगाव घटनेत सहभाग नाही. घटना घडली तेंव्हा आणि त्याच्या सहा महिने अगोदर भिडेंचा त्या भागात संचारही नाही. असे विधान करत, मुख्यमंत्र्यांनी भिडेंना क्लिनचिट दिली आहे.

काल काढलेल्या एल्गार मोर्चात प्रकाश आंबेडकरांना मी परिस्थिती समजून सांगितली आहे. आंबेडकरांनी कालच्या बैठकीत फेसबुकवरील पुरावे दिले आहेत. त्यांनी दिलेल्या पुराव्यावरून आठ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन आंबेडकरांना दिले आहे. असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटले आहे.

या घटनेत कोणीही जवाबदार असेल, अगदी माझे नातेवाईक का असेना त्यांना मी सोडनार नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आढळला तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ‘भिडेंसह एकबोटेला दंगल करतांना मी पाहिले’, असे एका महिलेने सांगितले होते. त्यानुसार तक्रार दाखल केली गेली, पण अद्यापही चौकशीतून एकही पुरावा भिडेंविरोधात मिळालेला नाही. याप्रकरणाची चौकशी सुरूच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Related posts: